+918048128164
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.
गजकर्ण मुले आणि प्रौढ अशा दोघांमध्ये दिसणारे एक सामान्य त्वचा संक्रमण आहे. डर्मटोफाइट नावाच्या बुरशी यांमुळे गजकर्ण होतो. वैद्यकीय भाषेत या अवस्थेला टिनिआ या नावाने ओळखले जात असते आणि गजकर्ण हा आजार मानव आणि प्राण्यांना देखील प्रभावित करू शकतो. गजकर्ण संक्रमण त्वचेच्या त्या भागांमध्ये होतो, जे सामान्यपणें गरम आणि आर्द्र असतात उदा. चवड्यांमधील त्वचेच्या दुमड्या, पोट आणि मांडीचे मध्यभाग, डोक्याची त्वचा, बोटा इ. प्रभावित होत असलेल्या भागाच्या नावावर गजकर्णच्या विभिन्न प्रकारांची नावे पडतात. उदा. टिनएक्युरिस पोट आणि मांडीच्या मध्यभागात, टिनकॅपिटिस डोक्याच्या त्वचेत, टिनेऑन्गिनिअम चवड्यांच्या नखांमध्ये, टिनएपेडिस (एथ्लीट्स फुट) तळपायांमध्ये आणि टिनएमॅन्युम हातांमध्ये होतो. टिनएपोरिस शरिराच्या कुठल्याही भागात होणार्र्या बुरशीजन्य संक्रमणाची सामान्य व्याख्या आहे. गजकर्ण वर्तुळाकार अंगठीच्या आकारात असून, केंद्रात स्वच्छ क्षेत्र असते. या अंगठीच्या किनारी उभारी असलेल्या, लाल रंगाच्या आणि ढलप्या असतात. गजकर्णामध्ये प्रभावित क्षेत्रात असह्य खाज होते. टिनिआ याला गजकर्ण हे नाव त्याच्या विशिष्ट आकारामुळे पडले आहे. गजकर्ण प्रभावित व्यक्ती, प्राणी किंवा पाळीव प्राण्याच्या माध्यमातून, बुरशी असलेली माती किंवा थरामार्फत सहज पसरतो. अशक्त रोग प्रतिकार असलेल्या लोकांमध्ये, उदा. एचआयव्ही, मधुमेह किंवा कर्करोगाच्या रुग्णांमध्येही तो सामान्यपणें आढळतो. डॉक्टर संक्रमित त्वचेच्या नमुन्याच्या शारीरिक व सूक्ष्मदर्शी चाचणीच्या आधारे गजकर्णाचे निदान करतात. सौम्य प्रकाराचा गजकर्ण बुरशीरोधी लेपन आणि लोशनच्या बाह्य अनुप्रयोगाद्वारे बरा होतो. तथापी, गंभीर प्रसंगांमध्ये, मौखिक बुरशीरोधी औषधेही हवी असतात. तसेच, निरोगी सवयी उदा. त्वचा स्वच्छ ठेवणें आणि एकूण स्वच्छता ठेवणें, याद्वारेही गजकर्ण टाळण्यात मदत मिळते गजकर्ण लक्षणे वैशिष्ट्यपूर्ण गजकर्ण त्वचेवरील ओरखडे किंवा वर्तुळ अथवा अंगठीच्या आकारातील वळूच्या रूपात असतो. गजकर्णाच्या किनारी उभारी असलेल्या, पाहणीत लाल आणि चंदेरी ढलपी असलेल्या असतात. वर्तुळाकार गजकर्णाचे केंद्रीय भाग स्वच्छ व अप्रभावित असते. प्रभावित त्वचेच्या पट्ट्यात असह्य खाजवते आणि हा पट्टा उपचारा अभावी आकार आणि संख्येत वाढत राहतो. विशिष्ट त्वचेवरील ओरखड्याशिवाय, त्वचेच्या विभिन्न क्षेत्रांतील गजकर्णामुळे खाली सांगितल्याप्रमाणें वेगवेगळी लक्षणे उमटू शकतातः टिनिअकॉर्पोरिस किंवा शरिराच्या कोणत्याही भागातील गजकर्ण उभारलेली किनारी आणि केंद्रात स्पष्ट क्षेत्रासह गोल पट्टा.हा पट्टा लाल, गुलाबी, राखाडी किंवा तपकिरी असा दिसू शकतो.अनेक अंगठीच्या आकाराचे पट्टे एकत्र मिळून मोठ्या स्वरूपात वाढू शकतात.काही वेळा, ओरखड्याच्या भोवती पूने भरलेले वळूही दिसू शकतात. टिनअक्युरिस किंवा पोट आणि मांडीच्या मध्यभागीचा गजकर्ण (जॉक इच) संक्रमणाच्या प्रारंभिक टप्प्यांत या भागात सूज व लालसरपणा असतो.ओरखडा हळूहळू आकारात वाढून, आतील मांडी, कंबर आणि गुदाशयापर्यंत पोचू पाहतो.प्रभावित त्वचेमध्ये ढलपी होतात, जे सोलल्याप्रमाणें निघू शकतात किंवा त्यांच्यात फटी होतात.संक्रमणातील वर्तुळाकार पट्ट्याची किनार उभारी असलेली आणि पू सारख्या वळूंनी भरलेली असू शकते.संक्रमणासह वारंवार गंभीर खाज होते. टिनएपेडीस किंवा पायाच्या तळव्यावरील गजकर्ण (एथ्लीट्स फुट) पायांचे तळवे आणि चवड्यांमधील त्वचा सहज सोलल्याप्रमाणें निघणार्र्या ढलपी असलेली आणि कोरडी असते.कोरड्या त्वचेत फटी होऊन त्या फटींतून रक्त निघते.तळपायांच्या इतर भागांत संक्रमण होऊन, पू ने भरलेले वळू, असह्य खाज व वेदनेसह ओरखडा तयार होतो.चवड्यांमधील त्वचा पांढरी, मऊ आणि स्पंजसारखी होते.गंभीर संक्रमणामुळे, तळपायाच्या प्रभावित त्वचेतून, विशेषकरून चवड्यांच्या मधोमध, किळसवाणा वास येतो. टिनऑंगिनम किंवा नखांवरील गजकर्ण एक किंवा अनेक नखांवर प्रभाव असू शकतो.संक्रमणाच्या प्रारंभिक टप्प्यात नखाच्या गादीवर सूज व लालसरपणा दिसतो.नखांचे रंग काळे, पिवळे किंवा हिरवे होते.संक्रमण पुढे वाढल्याने, नखे जाड, पोकळ आणि नखाच्या गादीपासून विलग होतात.हे एथ्लीट्स फुट असलेल्या लोकांमध्ये सामान्यपणें दिसून येते. टिनएकॅपिटिस किंवा डोक्याच्या त्वचेवरील गजकर्ण डोक्यावरील त्वचेमध्ये ओहोटीचे पट्टे होतात.केस गळून टक्कल पडते.टकलीच्या ठिकाणी काळे डाग दिसतात.डोक्याच्या त्वचेवरील प्रभावित त्वचा दाहामुळे लाल आणि सुजलेली असते.डोक्याच्या त्वचेत गंभीर खाज देखील सामान्यपणें दिसते. टिनएबार्बे किंवा दाडीमधील गजकर्ण जाड केस असलेल्या दाडी-मिशांच्या क्षेत्रात गजकर्ण होतो.त्वचा लाल होते, सूज येते आणि एक पारदर्शक द्रव्याची गळती होते.प्रभावित त्वचेत पू ने भरलेले वळूही असू शकतात.प्रभावित क्षेत्रातील केस नष्ट झालेल्या हेअर फॉलिकलमुळे गळतात.प्रभावित त्वचेत गंभीर खाज होते. टिनएमॅनम किंवा हातांमधील गजकर्ण हातांवरील त्वचा खूप कोरडी होऊन मध्ये फटी असतात.हाताच्या मागच्या भागात सामान्यपणें संक्रमणाचा अंगठीच्या आकाराचा पट्टा दिसतो. टिनएफेसी किंवा चेहर्र्यावरील गजकर्ण. दाडी सोडून बाकीच्या चेहर्र्यावरील त्वचा लाल होते.चेहर्र्यावर गंभीर खाज आणि दाह होतो, विशेषकरून सूर्याला उघड पडल्यावर असे होते.प्रभावित त्वचेवर अंगठीच्या आकाराचा ओरखडा दिसू अगर दिसू शकत नाही. गजकर्ण चा उपचार - Treatment of Ringworm in Marathi गजकर्णावरील उपचार शक्य तेवढे लवकर सुरू करून, आजारात वाढ व त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणें हा उपचार निरंतर केला पाहिजे. हा उपचार संक्रमणाचे ठिकाण आणि गांभीर्यावर आधारित असते. बुरशीजन्य औषधे बुरशींची वाढ आणि दुपटी रोखू शकतात आणि संपूर्णपणें संक्रमणाला नष्ट करण्यास मदत करू शकतात. दुकानात सहज मिळणारी बुरशीजन्य औषधे अधिकतर प्रकरणांमध्ये, बुरशीरोधी लेपन, पूड, फवारणी किंवा लेप लावल्याने संक्रमण 2 ते 4 आठवड्यांत बरा होऊ शकतो. बुरशीरोधी औषध असलेले नेल वार्निश नखांवरील गजकर्णामध्ये वापरण्यात येते. मौखिक बुरशीरोधी औषधोपचार संक्रमण त्वचेच्या मोठ्या भागात पसरलेले असल्यास, मौखिक बुरशीरोधी औषधे गजकर्णावरील उपचारासाठी आवश्यक असतात. डोक्यावरील त्वचेतील गजकर्ण बुरशीरोधी लेपन किंवा फवारणी वापरल्याने बरा होत नाही. पुढल्यासारख्या मौखिक औषधांच्या मदतीने संक्रमण पूर्णपणें बरा व्हायला 1 ते 3 महिने लागतात. बुरशीरोधी शॅंपू मौखिक औषधांच्या जोडीने डोक्यावरील त्वचेच्या गजकर्णासाठी वापरल्या जातात. जीवनशैली व्यवस्थापन उपचारपद्धतींशिवाय, जीवनशैली बदलूनही गजकर्णाची सोय केली जाऊ शकते. निरोगी सवयी काटकोरपणें पाळून आणि योग्य दैनंदिन स्वच्छता राखून गजकर्णाला शरिराचे इतर भाग किंवा लोकांमध्ये पसरण्यास रोखता येते. शरिराच्या इतर भागांमध्ये संक्रमणाचे पसार टाळण्यासाठी गजकर्णाने प्रभावित त्वचेला स्पर्श केल्यानंतर हात साबण आणि पाणीने स्वच्छ धुवावे.स्वच्छ ठेवण्यासाठी, प्रभावित क्षेत्र निरंतर धुवावे.एथ्लीट्स फुटच्या बाबतीत, संक्रमित भाग कोरडा ठेवण्यासाठी मोजे किंवा बूट घालणें टाळावे, कारण बुरशीची वाढ आणि दुपटी उष्णता आणि आर्द्रतेमुळे वाढतात. तसेच, आर्द्र खोल्या, लॉकर रूम आणि सार्वजनिक स्नानगॄहांमध्ये अणवाणी जाणें टाळावे आणि चपला घालाव्यात, जेणेकरून इतरांप्रत संक्रमण पसरणार नाही.स्वच्छ आणि कोरडे कपडे (विशेष करून सुती कपडे) आणि अंतर्वस्त्रे ही घालावीत.खाजगी प्रकारच्या वस्तू इतर लोकांशी वाटू नयते.आपण नियमित काही वेळ व्यायाम करावे आणि निरोगी राहाल असे वजन ठेवावे.