+918048128164
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.
मधुमेह म्हणजे काय? तो कसा होतो? जाणून घ्या मधुमेह डायबिटीज (Diabetes) म्हणजेच मधुमेह आता सगळ्यांना माहित असलेला आजार झालाय. दर दहा माणसांमागे ४ माणसांना तरी मधुमेहाची समस्या असतेच. खूप कमी कुटुंब अशी आहेत जिथे हा आजार दिसत नाही. आपल्या भारत देशात मधुमेहींची संख्या खूप जास्त आहे. त्यातल्या त्यात डायबिटीज टाइप-1 आणि डायबिटीज टाइप-2 या श्रेणीतील रुग्ण तर झपाट्याने वाढत आहेत. जगातील मधुमेहाची राजधानी म्हणून भारत ओळखला जातो हि एक खेदाची गोष्ट आहे. पूर्वी मधुमेह म्हटला कि लोकं घाबरून जायचे, आताही घाबरतातच पण त्यामानाने आता बऱ्यापैकी जागरुकता निर्माण झाली आहे. तरी काही गोष्टी अशा आहेत ज्या आजही सामान्य लोकांना माहित नाहीत आणि याच गोष्टी आज आम्ही तुमच्यापुढे उलगडणार आहोत. चला तर जाणून घेऊया काय आहे हा मधुमेहाचा आजार? काय आहेत याची लक्षणे? यावर उपचार असतील तर ते काय आहेत? मधुमेह म्हणजे काय? मधुमेह एक अशी समस्या आहे ज्यात रक्तामध्ये साखरेचा स्तर नियंत्रित राहत नाही. आता तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की अचानक कशी साखर नियंत्रित होणे बंद होते? त्या आधी कशी काय साखर नियंत्रित व्हायची? चला जाणून घेऊया या दोन्ही प्रश्नांची उत्तरे..! आपल्या शरीरात पेंक्रीयाझ नावाची एक ग्रंथी असते. यातून इन्सुलिन नावाचं हार्मोन तयार होत असतं. हेच इन्सुलिन आपली शरीरातील रक्तात तयार होणाऱ्या ग्लुकोज वा साखरेची मात्रा नियंत्रित ठेवण्याचं काम करतं. पण शारीरिक बदलासह पेंक्रीयाझ इन्सुलिन तयार करू शकत नाही आणि साखरेचा स्तर वाढत जातो. शेवटी तो मनुष्य मधुमेहाला बळी पडतो. मधुमेह शरीराला कसा त्रास देतो? रक्तात ग्लुकोजची मात्रा वाढल्याने रक्तात उपस्थित घटकांचं संतुलन बिघडतं. जसं कि रक्तात पांढऱ्या रक्त पेशी (WBC) आणि लाल रक्त पेशी (RBC) असतात. यांच्यासोबतच प्लाझ्मा सुद्धा असतो. ऑक्सिजन सुद्धा रक्त प्रवाहासोबत शरीरात प्रवाहित होत असतं. पण जेव्हा रक्तात ग्लुकोजचा स्तर वाढत जातो तेव्हा लाल रक्त पेशी ज्या जखमेला लवकर भरण्याचं काम करतात. त्या ग्लुकोजची मात्रा वाढल्याने आपलं काम नीट पार पडू शकत नाहीत. पांढऱ्या पेशी ज्या आपल्या शरीराला रोगप्रतिकार शक्ती प्रदान करतात त्यांचा प्रभाव सुद्धा अतिग्लुकोजमुळे कमी होतो. यामुळे मधुमेहासोबत इतरही आजार आणि व्याधी शरीराभोवती विळखा घालू लागतात. मधुमेहाची प्राथमिक लक्षणे सामान्यत: जेव्हा शरीरात ग्लुकोज व साखरेची मात्रा वाढू लागते तेव्हा हाय ब्लड प्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाबाचा त्रास सुरु होतो. हे यामुळे होतं कारण रक्तात ग्लुकोज वाढल्याने रक्त गढूळ होतं आणि ह्या दुषित रक्ताचा प्रवाह संथ होऊन हे रक्त वेळेत हृदयापर्यंत पोहोचत नाही. ते रक्त पोहोचावे म्हणून शरीर जोर लावते. यालाच उच्च रक्तदाब म्हणतात. याव्यतिरिक्त त्वचेशी निगडीत समस्या सुद्धा दिसू लागतात. ग्लुकोजच्या वाढत्या मात्रेमुळे पांढऱ्या पेशी अकार्यक्षम झाल्याने रोग प्रतिकारक शक्ती कमी होते. यामुळे त्वचेवर इन्फेक्शन, जळजळ आणि अन्य समस्या सुरु होतात आणि या समस्या दूर होण्यास सुद्धा खूप वेळ लागतो. ब्लड प्रेशर आणि त्वचेशी निगडीत समस्या शरीरातील साखर आणि ग्लुकोज या दोन गोष्टी अशा आहेत ज्या आपल्या शरीराला उर्जा देण्याचे काम करतात. या आपल्या शरीराचं इंधन आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. परंतु यांची मात्रा अधिक वाढल्याने इन्सुलिनची निर्मिती कमी होत जाते. त्यामुळे एकाच ठिकाणी हि साखर व ग्लुकोज अडकून राहते व शरीरात असूनही त्याचा शरीरासाठी काही उपयोग होत नाही. त्यामुळे शरीरात उर्जेची कमतरता भासते व हि उर्जा भरून काढण्यासाठी शरीर तुमची भूक वाढवते. म्हणूनच मधुमेहाच्या सुरुवातीच्या काळात अचानक मोठ्या प्रमाणावर भूक लागण्यास सुरुवात होते. या कमी ऊर्जेमुळे अजून एक समस्या निर्माण होते ती म्हणजे शरीर खूप थकत जाते. अति मेहनतीची कामे करणे शक्य होत नाही आणि आळस वाढत जातो. तर मंडळी हि काही लक्षणे आहेत जी दिसू लागल्यास तुम्ही तत्काळ मधुमेहाचे उपचार सुरु करणे आवश्यक आहे.