+918048128164
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.
▪️ मुतखडा▪ मूत्रपिंड किंवा लघवीच्या मार्गात तयार होणारे कठीण स्फटिकजन्य पदार्थ मुतखडा म्हणून ओळखले जातात. लघवीतील न विरघळलेले स्फटिकजन्य पदार्थ एका जागी जमा होऊन मुतखडा निर्माण करतात. मुतखडा मूत्रपिंड (किडनी), मूत्र-वाहिनी व लघवीची पिशवी यामध्ये कोठेही होऊ शकतो. *मुतखडा बनण्याचे कारणे* : 🔹 लघवीचे प्रमाण कमी होऊन मुतखडा तयार करणारी घटके जास्त प्रमाणात वाढल्याने. 🔹 लघवीतील न विरघळणारे स्फटिकजन्य पदार्थ एकत्रित जमा झाल्याने. 🔹 पाण्याचे शरीरात प्रमाण कमी झाल्याने. 🔹 मूत्रमार्गात होणारे जंतुसंसर्गामुळे नायडस तयार होऊन क्षार बनल्याने. *मुतखड्याचे प्रकार:* 🔹 कॅल्शियम: कॅल्शियम ऑक्झलेट किंवा कॅल्शियम फॉस्फेट चे खडे तयार होऊन मुतखडा होतो. 🔹 यूरिक ॲसिड: लघवीत युरिक ॲसिड प्रमाण वाढून त्याचे मूतखडे बनतात. *लक्षणे* : कामाच्या गडबडीत तर कधी दुर्लक्षामुळे तासनतास पाणी पिण्याचे लक्षात येत नाही. मग अचानक ओटीपोट किंवा पाठीत दुखायला लागते. निदान झाल्यानंतर मुतखडा झाल्याचे लक्षात येते, त्याची लक्षणे जाणून घेऊयात..... मुतखडा हा अतिव यातना देणारा रोग आहे. मुतखड्याचा असह्य त्रास थांबवण्यासाठी आपल्याला औषधे घ्यावी लागतात. मुतखड्याची मूत्रमार्गात हालचाल होऊन अडथळा येतो त्या वेळी तीव्र वेदना जाणवते. ज्या बाजूस मुतखडा असेल त्या बाजूस तीव्र वेदना होते. पाठी, पोट, ओटीपोटात तीव्र वेदना होते लघवीत रक्त जाते. लघवी पुन्हा-पुन्हा आल्याची संवेदना होते लघवी करताना जळजळ होते. जंतूसंसर्ग होऊन थंडी ताप येतो. *मुतखडा न होण्यासाठी करावयाचे उपाय:* जास्तीत जास्त पाणी पिणे हा निरोगी आयुष्यासाठी आणि मुतखड्या सारख्या विकारावर आळा घालण्यासाठी उत्तम उपाय आहे. मुतखडयांना रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दररोज पुरेसे पाणी म्हणजेच 8 ते 12 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. आहारामधील सोडीयम आणि प्राण्यांच्या मांसातून मिळणारी प्रथिने (मांस आणि अंडी ) नियंत्रित ठेवल्यास मुतखड्याचा त्रास टाळण्यास मदत होऊ शकते. अधिक माहिती व उपचारांसाठी संपर्क डाॅ धंदुके यांचे गुरूकृपा क्लिनिक वडगाव मावळ गुरूकृपा आयुर्वेद आयुएस्थेटिक्स तळेगाव दाभाडे संपर्क 8856860463