+918048128164
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.
टाच दुखणे Planter Faseitis आपल्या दैनंदिन जीवनात बहुतांश वेळा जाणवणारे पण अनेकदा दुर्लक्षित होणारे काही आजार आढळून येतात. सकाळी उठल्यापासून त्याचे पडसाद आपल्या नित्य-कर्मांवर आणि आरोग्यावर पडत असतात. यातील एक मुख्य आजार म्हणजे 'प्लांटर फॅसिटायटिस'. टाचदुखी प्रकारात मोडणाऱ्या या आजाराविषयी आज आपण माहिती घेऊयात. टाचदुखीचे मुख्यता टाचेचे हाड वाढणे व टाचेला सुज येणे हे दोन प्रकार आहेत. "प्लांटर फॅसिटायटिस" हा सामान्यपणे टाचदुखींच्या आजारांपैकी एक आहे. 'प्लांटर फॅसिआ' हे आपल्या टाचेत आढळणारे एक प्रकारचे जाड 'लिगामेंट' असतात. 'प्लांटर फॅसिआ' हा आपल्या टाचेला तळपायाच्या समोरील बाजूस म्हणजेच पंजास जोडलेला असतो ज्यामुळे पायाला कमानाकृती प्राप्त होते आणि चालण्यास मदत होते. "प्लांटर फॅसिटायटिस " या आजारात टाचेत सुज येऊन वेदना निर्माण होतात. दीर्घकाळ आपल्या पायांना कुठल्याच प्रकारची हालचाल नसताना अचानक आपण चालायला लागतो, तेंव्हा हा त्रास जाणवतो. "प्लांटर फॅसिटायटिस" या आजाराची अनेक कारणे आहेत. काहींना हा त्रास अगदी सौम्यपणे जाणवतो तर काही व्यक्तींमध्ये याची तीव्रता अधिक असते. टाचदुखीची कारणे या आजाराची अनेक कारणे आहेत आणि त्यावर विविध उपाय देखील आहेत. मुख्यत: दीर्घकाळ पायांची हालचाल न करता अचानक त्यावर भार आल्याने टाचेत वेदना निर्माण होतात. शरीराच्या अचानक वाढलेल्या वजनामुळे टाचेवर अति भार येऊन टाच दुखू लागते तेंव्हा हा आजार विकसित होतो. गर्भवती स्त्रियांचे गर्भधारणे दरम्यान अत्यंत अल्प वेळात वजन वाढते. त्यामुळे गर्भधारणे दरम्यान सुद्धा अनेक स्त्रियांना हा त्रास जाणवतो. जास्त वेळ एकाच ठिकाणी उभे राहिल्याने, लांब अंतर पळण्यामुळे / चालण्यामुळे आणि विशेषतः रनर्स मध्ये, नेहमी चालण्याने किंवा पायांना आराम न देता दीर्घकाळ उभे राहिल्यावर टाचांमध्ये या वेदना निर्माण होतात. अति व्यायाम करणाऱ्या व्यक्तींमध्ये सुद्धा "प्लांटर फॅसिटायटिस" ची लक्षणे आढळतात. उपचार विशिष्ट प्रकारचा पायांचा व्यायाम करणे, स्ट्रेचिंग करणे आणि वैद्यकीय साधनांचा वापर करून "प्लांटर फॅसिटायटिस" वर उपचार केला जातो. या उपचारात खालील गोष्टी प्रामुख्याने वापरल्या जातात - फिजिकल थेरपी - फिजिकल थेरपी मध्ये काही विशिष्ट प्रकारचे व्यायाम करून पायांचे स्नायू मजबूत करणे यावर भर असतो. पायाचे स्नायू मजबूत झाल्याने तुमच्या टाचेत आणि पंजांमध्ये स्थिरता निर्माण होते. व्हिटॅमिन आणि कॅल्शिअम ची कमतरता - हाडांमध्ये व्हिटॅमिन डी आणि कॅल्शिअम या जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे सुद्धा हा त्रास होऊ शकतो. अग्नीकर्म - Thermal Cauterization ने डाग देऊन देखील यावर उपचार केला जातो. रक्तमोक्षण - यात टाचेजवळच्या शीरेतून अथवा जळूद्वारे रक्तमोक्षण केले जाते. विद्धकर्म - जास्त दुखणे असणारे जागेवर सुई टोचून हा उपचार केला जातो. इंजेक्शन - जर त्रास अधिकच वाढला आणि वेदना असह्य झाल्या तर स्टेरॉइडचे इंजेक्शन देऊन वेदना तात्पुरत्या कमी करता येतात. शस्त्रक्रिया(Surgery) - जर हा आजार शेवटच्या टप्प्यात पोहोचला आणि इतर सर्व पर्याय अपयशी ठरले तर शस्त्रक्रिया करणे हाच एकमेव उपाय उरतो. "प्लांटर फॅसिटायटिस" हा टाचदुखी चा सर्वसामान्य आजार असला तरी वेळेत आणि योग्य उपचार करून या वेदनांपासून मुक्तता मिळू शकते. वरील सर्व उपचार गुरुकृपा आयुर्वेद येथे उपलब्ध आहेत. Heel Pain or Planter Fasciitis One of the most common but often overlooked illnesses found in our daily life. From morning his prasadas fall on our routine and health. One of the main diseases is 'Plantar Fasciitis'. Today we are going to know about this illness which is cause of Acute Pain. There are two types of Heel Pain mainly due to Growth on Heel and Swelling in Ankle or Heel. "Plantar fasciitis" is one of the most common ankle disorders. Plantar fascia is a type of thick 'Ligament' found in ankle. The 'plantar fascia' is attached to the ankle at the front of the foot, which allows the leg to get Arched and move. "Plantar Fasciitis" causes swelling and pain in the ankle. For a long time there is no movement of our feet when we suddenly start to walk, when we feel this pain. There are several causes of "plantar fasciitis". Some people experience this disorder mildly, while others have a high severity. Causes of Heel Pain There are many causes of this illness and there are various remedies. Generally, sudden loads on Heel can cause this pain. The disease develops when suddenly the body's weight is transformed to the ankle and the Heel is hurts. Pregnant women gain weight in very short time during pregnancy. Therefore, many women also experience this problem during pregnancy. These pains in the ankles can be caused by standing too long, running long distances / walking, and especially in runners, without having to walk or rest for a long time. Symptoms of "Plantar Fasciitis" are also found in those who exercise too much. Treatment A particular type of foot exercises, stretching, and using medical equipment is treatment for "plantar fasciitis". The following are mainly used treatments - Physical Therapy or Physiotherapy focuses on strengthening the muscles of the legs through certain types of exercise. The strengthening of the leg muscles creates stability in your ankles and toes. Vitamin and Calcium Deficiency - Vitamin D and Calcium deficiency in Bones. Agnikarm - It is also treated by staining with thermal Cauterization. Blood Letting - These include blood Letting from the veins near the ankle or by Leech Therapy. Viddhakarm - This treatment is done by injecting needles on the most painful area. Injections - If the pain is exacerbated and the pain becomes unbearable, the pain can be temporarily alleviated by injecting steroids. Surgery - If the disease reaches its final stage and all other options fail, then surgery is the only solution. Although "plantar fasciitis" is the most common illness, it can be relieved by timely and appropriate treatment. All the above treatments are available at Gurukrupa Ayurveda.